अध्याय: 13, ओवी: 184
ना तरी केळीं कापूर जाहाला | जेविं परिमळें आणों आला | कां भिंगारीं दीप ठेविला | बाहेरि फांके ||१८३||तैसें हृदयींचेनि ज्ञानें | जिये देहीं उमटती चिन्हें | तियें सांगों आतां अवधानें | चांगें आइक ||१८४||[ अमानित्वं - ‘अस्मिन्नवलक्षणानि’ ] तरी कवणेही विषयींचें | साम्य होणें न रुचे | संभावितपणाचें | वोझें जया ||१८५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.